तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील  शाकंभरी पोर्णिमा दिनी सोमवार दि. १७रोजी पुर्णाहुती दिल्यानंतर घटोत्यापन करण्यात येवुन शाकंभरी नवराञोत्सवाची सांगता झाली. .

पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला. सकाळी सहा वाजता यजमानांचा सिंहासन महाअभिषेक पुजा करण्यात आली नंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर दुपारी धुपारती करण्यात आली नंतर  श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवी मुर्ती समोर होमात यजमान प्रविण व त्यांची पत्नी मंजुषा कदम यांच्या हस्ते मंहत वाकोजीबुवा मंहत हमरोजी बुवा,  पाळीचे भोपेपुजारी विवेक, दिनकर, दिनोबा, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे,धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, प्रा.धनंजय लोंढे, उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, भोपे मंडळाचे अतुल मलबा, विशाल रोचकरी किशोर गंगणे, दुर्गादास अमृतराव, शिवाजी बोदले यांच्या उपस्थितीत  मंञोपचार गजरात  पुर्णाहुती देण्यात आली.नंतर कोहळ्याचा बळी देण्यात आला नंतर घटोत्यापन केले गेले.

 शाकंभरी नवराञोत्सवातील पोर्णिमा पार्श्वभूमीवर देविदर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.घटोत्यापनना नंतर ज्यांनी शाकंभरी नवराञोत्सवातील सात दिवस उपवास धरला होता त्यांनी देविचा नैवध प्राशन करुन उपवास सोडला.सांयकाळी पुनश्च देविजीस सिंहासन अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले .  देविचा प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर प्रक्षाळपुजा करण्यात आली.

 
Top