उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे साहेब यांचा १७जानेवारी हा वाढदिवस  संस्थेच्या सर्व शाळा,महाविद्यालये व संस्कार केंद्रात “ ज्ञान शिदोरी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यकक्रमाचे आयोजन १७जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक यांचेकडून एक पुस्तक भेट घेऊन महाविद्यालयातील हुशार व गुणी निवडक विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाटप उपप्राचार्य प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.राजा जगताप,प्रा.अतुल देशमुख,प्रा.बालाजी क—हाडे,प्रा.डाॅ.बालाजी नगरे,प्रा.माधव उगीले, रजिस्टार  लोकरे,  सुभाष पिंगळे उपस्थित होते.


 
Top