परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण २६ शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण विभाग, पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय यांच्या वतीने हा सोहळा शनिवारी  (दि.१) पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अनुजा दैन ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम,गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे, विस्तार अधिकारी सुर्यभान हाके, योगेंद्र खराडे,अनिता जगदाळे, सतिश संगमनेरकर, दत्तात्रय निर्मळे,रमेश बारसकर,भागवत घोगरे, दत्तात्रय गरड, ज्ञानेश्वर देवराम आदी मंचावर उपस्थित होते.सन २०१९-२० व २०२०-२१ मधील एकूण २६ पुरस्कार शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यात प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक, विषय तज्ञ,मोबाईल टिचर यांचा समावेश होता.महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे यांनी केले.यावेळी बोलताना म्हणाले, शिक्षण विभागाने तालुक्यातील अनेक राबविलेल्या शैक्षणिक उपक्रम, कोविड काळात केलेल्या कामांचा आवर्जून उल्लेख केला.यावेळी सूत्रसंचालन अरविंद बाराते व मनिषा जगताप यांनी अत्यंत समर्पक शब्दात सफाईदारपणे केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार नागनाथ गटकळ यांनी केले.

    यांना तालुका पुरस्काराने सन्मानित केले.

पल्लवी चव्हाण (परंडा ), संगिता शिंदे ( डोमगाव ), प्रभावती केमदारणे ( वाकडी ), भारत केमदारणे ( वागेगव्हाण ), माधुरी शिंदे ( आरणगाव ), अंबॠषी कदम ( खासगाव ), मनिषा कुलकर्णी ( शेळगाव), अंकुश गवळी ( गोसावीवाडी ), लक्ष्मण काळे ( इनगोंदा ), विशाखा तावरे ( सक्करवाडी ), सुरेखा भोसले ( वाटेफळ ) , गिता शिंदे-पाटील ( परंडा ), नागनाथ उकिरडे ( सोनारी ), श्रीपाद दुधाळ  ( पिंपळवाडी ), परमेश्वर जगताप ( वडनेर ), कल्याणी तांबे ( जवळा ), मनोज कोळी ( राजुरी ), महादेव गाडे ( तांदुळवाडी ), सचिन माळी ( आलेश्वर ), पांडुरंग साबळे ( आनाळा ), गोकुळ कोकाटे ( देवगाव बु.), उज्वला सोनवणे ( भांडगाव ), सिध्देश्वर मेदने ( वाटेफळ ), विलास थोरात ( सोनारी ), अंकुश डांगे व सारिका बेडके ( विषय साधनव्यक्ती ), सुषमा माने ( परिचारिका )


 
Top