परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील शेळगाव गावामध्ये विविध भागात म्हणजे माणिक बाबा विद्यालय जिल्हा परिषद शाळा सनराईज स्कुल शाळेत सोमवारी सकाळी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर दुसरीकडे संत सावता माळी मंदिरामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या कार्यक्रमाला पत्रकार-विजय शेवाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले.या कार्यक्रमाला विशेष म्हणजे लहान मुलींचा सहभाग होता तर शेळगाव गावचे तलाठी भाऊसाहेब.डाँक्टर-लहु शेवाळे.चत्रभुज शेवाळे हनुमंत शेवाळे प्रमोद शेवाळे बाळासाहेब शेवाळे ,पोलीस पाटील शितल शेवाळे,कार्यक्रमाला उपस्थित होते.


 
Top