उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 


लातुर-बोरगाव-मुरुड ते बार्शी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम फोर लाईन करण्याची मागणी -बळीराज पार्टीचे मराठवाडा विभाग प्रमुख अच्युत माधव पुरी यांनी उस्मानाबाद व लातूर जिल्हाधिकाऱ्यांनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले नमुद नमूद करण्यात आले आहे की, 

 बार्शी- पांगरी-येडशी-तडवळा-पळसप-मुरुड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेची वृक्ष तोड व लातूर कडील बाजूस काम हि चालू आहे हे काम थ्री लाईन आहे की, फोर लाईन आहे, किंवा डागडुजीचे आहे या संदर्भात  माहिती  घेण्यासाठी मा. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूर यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता असे माहिती झाले आहे की, लातूर-बोरगाव मुरुड हा राष्ट्रीय महामार्ग -4 लाईन आहे. हे डाकडूजीचे काम नसून नव्याने मंजूर झालेले काम आहेत व हा रस्ता मुरुड पासून मांजरा कारखान्यापर्यंत 6 कि.मी. (71/800 ते 77/800) मंजूर आहे.

तरी बार्शी-पांगरी-येडशी-तडवळा-पळसप-मुरुड-लातूर हा रोड 4 लाईन नवीन रित्या रस्त्याचे काम करण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालया समोर बळीराज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर बळीराज पार्टी विभाग प्रमुख अच्युत माधव पुरी यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top