उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तोरंबा तालुका उस्मानाबाद येथील रहिवाशी तथा उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी सभापती राहुल रामभाऊ पाटील वय 50 यांचे शुक्रवारी दि.21 जानेवारी रोजी सायंकाळी उस्मानाबाद शहरातील सांजा रोड येथे दुचाकी अपघातात निधन झाले. त्यांच्या दुचाकीला दुसर्‍या दुचाकीने जोराची धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी निरामय हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 11 वा.तोरंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top