तेर //प्रतिनिधी 

मकर  संक्रांतीचं वाण असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील चुड्यांना सर्वत्र मागणी होत आहे.

सौभाग्याचं लेणं म्हणून मकर संक्रांतीला चुडयाला  फार महत्त्व आहे.मकर संक्रांतीचा सनाला स्त्रिया हातात आवर्जून चुडा घालतात. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील गनी मणियार चुडे बनविण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करतात. लाखेपासून चुडा तयार करण्यात येतो. तो चुडा रांजा मध्ये टाकला जातो. त्यामध्ये पावडर टाकून लाखेच्या लगद्यापासून चुडयाचे रोल तयार केले जातात. कुंडावर लाखेचा चुडा ठेवल्यावर गरम होतो .त्यानंतर चुडा गोल करण्यात येतो. गोल झालेल्या चुडयावर बेगड लावले जाते. त्यानंतर चुडयावर ठसा उमटविला जातो पंचवीस चुडयाचा एक बॉक्स तयार करून तो विकला जातो.

तेर येथील  चुडयाना उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होते. चुडा तयार करण्याचा व्यवसाय साधारणतहा पाच महिने चालतो. चुडा तयार करण्याच्या व्यवसायातून पोटाला लागेल एवढे उत्पन्न मिळते अशी माहिती तेर येथील चुडा व्यवसायिक गनी मनियार यांनी दिली.

 
Top