उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ईपीएस - ९५ अल्प पेन्शन धारकांना पेन्शन वाढ देण्याच्या मागणीसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेच्या वतीने पालकमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले

  दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ईपीएस - ९५ पेन्शन अंतर्गत राष्ट्रीय संघर्ष समिती नॅक द्वारा अल्प पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे वेळोवेळी प्रधानमंत्री भारत सरकार व भविष्यनिर्वाह निधी विभाग यांना विनंती करून देखील पेन्शन वाढ होत नाही सध्या बुलढाणा येथे ११२८ दिवसापासून वरील मागण्यासाठी साखळी उपोषण चालू  असून उपोषण कर्त्याच्या मागण्या ७ हजार ५०० मासिक पेन्शन व महागाई भत्ता मिळावा उच्च पेन्शनची सुविधा मिळावी पती-पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी योजनेचा समावेश नसलेल्या पेन्शनधारकांना सामावून घेऊन त्यांना किमान ५ हजार मासिक पेन्शन देण्यात यावी अशा मागण्या दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत

  या निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत थोरात,अरुण सोनटक्के, पांडुरंग गाडे,नागनाथ काळे, एस.जी. गवाड,सुरेश शेळके,आर.जी भड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत


 
Top