उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मध्य रेल्वे, पुणे आणि सोलापूर मंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खासदारांची आणि रेल्वे समितीच्या सदस्यांसह रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक दुरदृश्यप्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वेच्याकामांबाबतआग्रही मागणी केली.

 याप्रसंगी उस्मानाबाद-सोलापूर हा सुरू असणाऱ्या रेल्वेमार्गासाठी एक पूर्णवेळ अधिकारी नेमून कामाच्या गतीमध्ये वाढ करणे अत्यावश्यक असल्याचे श्रेष्ठींच्या निदर्शनास आणले. त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील कळंब रोड, मौजे. तडवळा येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देणे अत्यावश्यक असून या ठिकाणी उस्मानाबाद, कळंब, वाशी, लातूर, बार्शी आणि अंबाजोगाई या ठिकाणच्या प्रवाशांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे सांगितले.

 लातूर रोड ते कुर्डूवाडी जंक्शन पर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण, लातूर-मुंबई व्हाया उस्मानाबाद इंटसिटी गाडी सुरु करणेबाबत, हैद्राबाद-हडपसर नियमीत व लोणावळ्यापर्यंत सुरु करणेबाबत, लातूर येथील कोच फॅक्टरी येथे भूमीपुत्रांना नोकरीकरीता प्राधान्य देणेबाबत, नांदेड जंक्शन दक्षिण मध्य रेल्वे विभागातूर मुंबई विभागास जोडणे, उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर फलाट क्र.-2 येथे प्रवासी शेडची निर्मीती करणे, कोच पोजीशन डिसप्ले बोर्ड बसवणे, स्टेशन वर गोडावून निर्माण करणे, कांदा उत्पादकांसाठी हंगामी रेल्वे गाडी सुरु करणेबाबत, मराठवड्यातील सर्व रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, उस्मानाबाद येथे पिट लाईन,  ATM मशीन ची सुविधा उपलब्ध करणे, कोल्हापूर-अमरावती गाडी नियमीत करणे, तिरुपतीसाठी नियमीत गाडी सुरु करणे, उस्मानाबाद रेल्वे स्टेशन ते उपळा वोहर ब्रीज पर्यत लाईट व्यवस्था तसेच रस्त्याची दुरुस्ती करणे, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे हॉस्पिटल, केंद्रिय विद्ययालय इत्यादी कामांचा मागण्या व पाठपुरावा मा. खासदार ओमराजे निबांळकर यांनी केला.

 सदर बैठकीसाठी   खासदार  ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर उस्मानाबाद, खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी सोलापुर, मा. खासदार  रणजितसिंह नाईक निबाळकर माढा,   खासदार  सुधाकर शृंगारे तातुर,   खासदार  डॉ. उमेश जाधव, कलबुगी आणि मा. खासदार संजयकाका पाटील,  अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई,  शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर  मनिजीत सिंह, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक,   मुकुल जैन, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक   अश्विनी सवसेना, प्रधान मुख्य अभियंता,  शैलेदसिंह परिहार, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर   प्रदिप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि शाखा अधिकारी दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


 
Top