उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील दारफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हेमंत सुरु तर उपाध्यक्षपदी भैरवनाथ नागनाथ जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.

तालुक्यातील दारुपळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी मुख्याध्यापक बबन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आले. या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य रवि जाधव, पोलिस पाटील सचिन जाधव, प्रकाश घुटे, अगंद घुटे, किशोर इंगळे, भैरवनाथ दादाराव जाधव,  धर्मराज जाधव यांच्यासह गावातील नागरीक, पालक उपस्थित होते.  

या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हेमंत सुरु, उपाध्यक्षपदी भैरवनाथ नागनाथ जाधव, सदस्यपदी नीता धनाजी जाधव, मंजूषा संतकुमार घुटे, प्रकाश काशीनाथ घुटे, बजरंग जगन्नाथ मस्के, आलिका किशोर ओव्हाळ, सारिका राजेश ओहाळ, यशपाल वामन ओव्हाळ,  रविंद्र जाधव, उत्तरेश्वर शिवाजी घुटे, एस. एस. जहागिरदार, वैष्णवी महादेव बोरके, सार्थक बालाजी इंगळे तर सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बबन रोहिदा कांबळे यांची निवड करण्यात आली. नुतन पदाधिकाऱयांचा गावचे सरपंच ऍड.संजय भोरे यांनी सत्कार केला.

 
Top