परंडा / प्रतिनिधी : -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ.प्रशांत गायकवाड यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने इंग्रजी विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्तीपत्र दिले आहे.डॉ.प्रशांत गायकवाड हे या महाविद्यालयात वरिष्ठ विभागांमध्ये कार्यरत आहेत.त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, आई क्यू ए सी चे चेअरमन डॉक्टर महेशकुमार माने, प्रा.डॉ.दीपक तोडकरी, गणित विभाग प्रमुख डॉ.विद्याधर नलवडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.संभाजी गाते, मराठी विभाग प्रमुख डॉ . हरिश्चंद्र गायकवाड, ग्रंथालय प्रमुख डॉ राहुल देशमुख ,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अक्षय घुमरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनंत खर्डे ,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे ,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन चव्हाण तसेच कनिष्ठ विभागाचे प्रा.संभाजी धनवे , प्रा.शंकर अंकुश, पर्यवेक्षक प्रा.दत्ता मांगले आधी सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते .यावेळी प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे अभिनंदन केले आपल्या हातून उत्तम दर्जाचे संशोधक तयार करावे यापेक्षा सह शुभेच्छा दिल्या.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.


 
Top