उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 देशाचे पंतप्रधान  मोदी  विकास कामांचे उद्घाटन व देशवासियांना संबोधित करण्यासाठी फिरोजपूर, पंजाब दौऱ्यावर गेले असता खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर प्रवास रद्द करत रस्त्यावरून प्रवास करण्याचे ठरले. यावेळी आपला पराभव समोर पाहून घाबरलेल्या विरोधकांनी कुटील डाव खेळला आणि काही आंदोलकांनी रस्ता बंद केला. यावेळी पंजाब मुख्यमंत्री यांनी कोणताही प्रतिसाद न देणे म्हणजे निचत्तम राजकारणाचे प्रदर्शन आहे. पाकिस्तान सीमेपासून निव्वळ १० किमी अंतरावर पंतप्रधानांच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला असला तरी त्याला उत्तर देणे आवश्यक होते. 

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या  वतीने  आ. सुजितसिंह ठाकूर व आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभरात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आई तुळजाभवानीची महाआरती करून साकडे घातले. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला ,त्यांनतर युवा मोरच्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कँडल मार्च काढून पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला ,तसेच आज महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून निचतेची परिसीमा ओलांडलेल्या कॉंग्रेसला सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली .

 याप्रसंगी दत्ता भाऊ कुलकर्णी,  ॲड.नितीन भोसले, अमोलजी निडवदे, राजसिंहा राजे निंबाळकर, बस्वराज रोडगे, अभय इंगळे, मकरंद पाटील, राहुल काकडे, आनंद कंदले, अभिराम पाटील, बालाजी कोरे, पांडुरंग पवार, नामदेव नायकल, प्रविण सिरसाठे, ॲड कुलदीपसिंह भोसले, गणेश देशमुख, पूजा देडे, देवकन्या गाडे, यांच्यासह  युवा मोर्चा व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top