परंडा / प्रतिनिधी : -

 तालुक्यासह राज्यात आजपर्यंत झाली नाही इतकी यंदा ऊसाची विक्रमी लागवड झाली आहे.पण तोडणी मात्र अद्याप ही पन्नास टक्के रखडली आहे. परिणामी ऊसावर तुरे उगवल्याने शेतकरी हतबल झालाय आहे. कारण या तुऱ्यामुळं उसाचं थेट पन्नास टक्के वजन घटत आहे. राज्यातील 547 लाख टन उसाचं गाळप अजून होणार आहे.हा विचार केला तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसान हे ठरलेलं आहे. याला निसर्गाच्या लहरीपणाचं कारण देत कारखानदार कोट्यवधींची साखर घशात घालू पाहतायेत. 

 महाराष्ट्रतील ऊस उत्पादक शेतकरी हतबल झालेत.ऊसावर तुरे उगवल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या तुऱ्याने उभ्या ऊसात पोकळी निर्माण केलीय आहे.परिणामी उसाचं वजन पन्नास टक्के घटत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचं याला कारण असलं तरी ऊस तोडणी दोन महिने लांबणीवर पडल्याचे देखील परिणाम आहेत. 

  राज्यात यंदा साडे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल 1096  लाख टन ऊसाची लागवड झाली आहे. आजवरची ही विक्रमी लागवड असल्याचं साखर आयुक्तांचं म्हणणं आहे. यातील 547 लाख टन उसाचं गाळप झाल्याने, यंदाचा गळीत हंगाम ही व्यवस्थित असल्याचा त्यांचा दावा आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड एकीकडे हा दावा करता आहेत.  पण दुसरीकडे पुण्याच्या मावळ तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील आकडेवारी बरंच काही सांगून जाते.  

  ऊसाच्या लागवडीनंतर त्याची साखर कारखानदार ही तोडणी दोन ते तीन महिने लांबणीवर टाकतात. त्यामुळे उसावर तुरे उगवतात अन् ते उभ्या ऊसाला पोकळ करतात. परिणामी ऊसाच्या वजनात किमान पन्नास टक्क्यांनी घट होते. साखरेची मात्र शंभर टक्के निर्मिती होते. शेतकऱ्यांचा हा दावा यामागचं आर्थिक गौडबंगाल समोर आणतोय.

 राज्यात 95 सहकारी आणि 95 खासगी साखर कारखाने आहेत. प्रत्येक कारखानदारांकडून असंच केलं जात असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार यंदा ऊसाची लागवड ही विक्रमी झाली आहे. त्यानुसार यातून साखरेची होणारी निर्मिती आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे विक्रमी असणं अपेक्षित आहे. मात्र साखर कारखानदाऱ्यांकडून या तुऱ्याचं कारण पुढं केलं जातं आणि ही विक्रमी उलाढाल लपविण्याचे धंदे त्यांच्याकडून केले जातात.असं अनेकदा बोललं गेलंय.परंतु यामुळं प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका ही बसतो. याचाच परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थकारणावर ही पडतो.


 
Top