तुळजापूर / प्रतिनिधी

 श्रीतुळजाभवानी मातेच्या  शाकंभरी नवराञोत्सवातील धार्मिक विधीचा सांगता शाकंभरी पोर्णिमा दिनी राञी मंदीरात छबिना कढण्यात आल्यानंतर मंहत वाकोजीबुवा यांनी दत्त मंदीरा समोर उपरण्यात जोगवा मागण्यात येवुन झाला .

सोमवार दि.१७ रोजी राञी मंदीर प्रांगणात हत्ती वाहनावर छबिना काढण्यात आला नंतर मंहत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा यांनी श्री दत्त मंदीरासमोर उपरण्यात   जोगवा मागितला.यावेळी भाविक भक्तांनी त्यांना उपरण्यात दक्षणा रुपात जोगवा दिला नंतर मंहतांनी सर्व भाविकांना खोबरेसाखरेचा प्रसाद वाटप केला.

यावेळी श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष  विशाल  रोचकरी, प्रा. धनंजय लोंढे,  बाबा खपले, आभिजीत कदम ,अमर कदम , विनोद व्यवहारे, ऊमाकांत रणदिवे, निलेश रोचकरी,  विशाल वागमारे, गणेश धोत्रे, पिंटु कामे,  विद्या गंगणे, साळुंके आक्का, जाधव, कान्होपात्रा, शैला, झाडपिडे, गोविंद गारडे, बाबुराल जाधव , तिरुपती वाघे सह भक्त मंडळी उपस्थितीत होते.


 
Top