परंडा/ प्रतिनिधी -

येथिल प्रसिध्द सुफीसंत हजरत खॉजा बद्रोद्दिन दर्गा कडे जाणाऱ्या रस्त्याचे बी बी एम च्या कामाचा शुभारंभ आज बुधवार दि.२६ रोजी माजी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.

हजरत खॉजा बद्रोद्दीन यांचा ऊर्स १० फेबुवारी रोजी होणार असून त्या पूर्वी हे काम पुर्ण करण्यासाठी  माजी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर हे काम युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

   यावेळी नगर अभियंता मम्हाने मॅडम, नगर परिषद कर्मचारी सोनवणे, नगरसेवक संजय घाडगे, नगरसेवक बच्चन गायकवाड, युवा नेते शफी पठाण,  तनवीर मुजावर, हैदर शेख, अहमद मुजावर, मोहसीन सौदागर, संतोष माळी ( महाराज ) , विठ्ठल जाधव,  अभी चौतमहाल आदी उपास्थित होते.


 
Top