तुळजापूर  / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्डा येथे आज शनिवार दि 1रोजीष पालक सभा घेवून त्यात  शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्षपदी  सौ. सविता सुग्रीव पांडागळे  यांची तर उपाध्यक्ष पदी   राहूल बाळासाहेब जाधव  यांची निवड करण्यात आली आहे.

 सदस्य म्हणून  संतोष जाधव,  राहूल कोळेकर, अंकुश खताळ,  मीना कोळेकर,  अश्विनी गंगणे,  छाया भोसले,  भाग्यश्री सुरवसे, शिक्षक सदस्य सुर्यवंशी व्ही. आर. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी ऋतुजा कोळेकर व अभिजित सातपुते यांची निवड करण्यात आली. 

यावेळी राजाभाऊ शेंडगे, मुख्याध्यापक श्री वाघमारे सर, माजी अध्यक्ष महादेव शिंगाडे, पवार सर, सुर्यवंशी सर, माने मॅडम, कानडे मॅडम, दत्ता खताळ अरूण सुरवसे यांचे सह बहुसंख्य पालक उपस्थित होते.


 
Top