उस्मानाबाद / प्रतिनिधी-
संताजी जगनाडे यांच्या कार्याचा पाठ्य पुस्कात  समावेश करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे व सर्वोतपरी प्रयत्न करून स्वतः  मुख्यमंत्र्यांची  भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन अा.कैलास पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान रथ यात्रेतील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती,संताजींच्या पादुका,हस्त लिखित गाथा यांचे पुजन तुळजापुर नगरीत आई तुळजाभवानीच्या महाद्वार येथे संताजी जगनाडे महाराजांचे 11 वे वंशज गोपाळशेट जगनाडे व बाळासाहेब काळे,तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने,जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,राज्य समन्वयक सुनिल चौधरी,सेवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पन्हाळे,विभागिय अध्यक्ष डॉ.रावसाहेब राऊत,सचिन राऊत,अदिनाथ ठेले,लोहारा तालुका अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी,व तुळजापुर येथिल समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले.
तसेच उस्मानाबाद शहरात उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,बारा बलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,दत्ता बंडगर,नगर परीषदेचे गटनेते सोमनाथ गुरव,डी सी सी बँकेचे संचालक भारत डोलारे,यांनी रथाचे स्वागत करून संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीचे पजन केले.यानंतर या अभियानाचे प्रास्ताविक रवि कोरे-आळणीकर यांनी केले.  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाप्रयंत पोहचविण्यासाठी जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमास अँड विशाल साखरे,नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,जि प सदस्य नितिन शेरखाने,महादेव मेंगले,लक्ष्मण निर्मळे,आबासाहेब खोत,सतिश कदम,शिवानंद,कथले,संजोग पवार,दिपक पवार,मुकेश नायगावकर,अँड खंडेराव चौरे,पिराजी मंजुळे,दाजी आप्पा पवार,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्र्य बेगमपुरे,सतिश लोंढे,रमेश साखरे,दिपक नाईक,जितेंद्र घोडके,नागेश निर्मळे,गणेश खबोले,प्रमोद बंगले,नागेश बंगले,राजकुमार अंबुसे,शिवकुमार दळवी,बाबुराव कलशेट्टी,इंद्रजित म्हेत्रे,महेश कलशेट्टी,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top