उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील जाधववाडी रोड किंड्स किंग्डम इंग्लिश स्कूलपासून पुढे हिंदू स्मशानभूमी रस्ता अतिशय खराब झाला होता. सदरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते, त्यामुळे त्या ठिकाणी सतत अपघात घडत होते. अत्यंविधीसाठी जाताना या मार्गावरुन मोठया प्रमाणात कसरत करावी लागत होती. पायी चालणाज्या नागरिकांना अतिशय मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. सदरच्या रस्त्याची गेल्या 4 ते 5 वर्षापासून दुरावस्था झाली होती. याबाबत बहुजन एकता विकास परिषदेच्या वतीने गेल्या 1 ते 2 वर्षापासून पूर्णपणे आक्रमक भूमिका घेवून सतत नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी मांडण्यात आली. आणि अखेर नगर परिषद प्रशासनाने सदरचा रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात केली.

    हिंदू स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करण्यास तात्काळ सुरुवात केल्याबद्दल बहुजन एकता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत   बनसोडे यांनी नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे साहेब यांचा नगर परिषद कार्यालयात पुष्पगुच्छ व पुष्पहार देवून अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रवक्ता संग्राम बनसोडे, उमेश सिरसाठे, विलास साकळे, विनायक गायकवाड, तांबरी येथील युवा कार्यकर्ते राहूल गंगावणे, प्रशांत शिंगाडे, राजरत्न ओव्हाळ, प्रित्यार्थ ओव्हाळ, रावसाहेब मस्के आदि उपस्थित होते. त्याचबरोबर हिंदू स्मशानभूमी रस्ता दुरुस्त करणे बाबत बहुजन एकता विकास परिषदेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top