उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या प्रमुख मागणीसाठी  शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी  उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर अामदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखली शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान महावितरण कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व दत्ता कुलकर्णी यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागत अनेक आरोप करत या सरकारचा निषेध केला. विशेष म्हणजे जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे तुटपूजे अनुदान आले आणि त्यात पुन्हा शेतातील विज खंडीत करू लागले. त्यामुळे संतप्तृ शेतकऱ्यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले. 

खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगतजिसिंह पाटील, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे,अमर बाकले, प्रशांत रणदिवे,राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी,सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.

 
Top