उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय अंतर्गत येथील नेहरु युवा केंद्रामार्फत सामाजिक,क्रीडा,स्वयंरोजगार पर्यावरण विकास,युवक विकास तसेच राष्ट्रीय एकात्मक आदी क्षेत्रात वर्षे 2021-22 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळाला जिल्हा विशेष युवा मंडळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या मंडळाला 25 हजार रुपये,राज्यपातळीवर ठरलेल्या मंडळाला एक लाख रुपये,राष्ट्रीय पातळीवरील पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम पाच लाख रुपये,द्वितीय तीन लाख रुपये आणि तृतीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारासाठी दि.31 डिसेंबर 2021 पूर्वी अर्ज नेहरु युवा केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला रुम नं.26,उस्मानाबाद येथे दाखल करावेत.अधिका माहितीसाठी 02472-222719 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांनी केले आहे.


 
Top