उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लातूर दौर्‍यावर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे शनिवारी (दि.18) आले होते. यावेळी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यावर बच्चू भाऊ यांनी लवकरच उस्मानाबाद येथे येण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिली.

यावेळी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष नवनाथ मोहिते, उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, उस्मानाबाद शहराध्यक्ष जमीर शेख, तुळजापूर शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी, शिवकुमार माने आदी उपस्थित होते.

 
Top