उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन रविवार दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी, लक्ष्मी नरसिंह मंदीर, जुने राम मंदीर, इंगळे गल्ली उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात शहरातील व परिसरातील सर्व वयोगटातील ४४५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नागरीक अंबादस दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे शैलेश कुलकर्णी, अशोक मोरे, सुरज शेरकर, दिलीप लोहार, राजाभाऊ शेरकर, संतोष, खैरे, दादा कोळगे, मधुकर ढवळे, आशीष मोरे, निखील मत्ते, चैतन्य शेरकर, आशा कार्यकत्या, कर्मचारी शिक्षक व शिक्षीका नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.रोहीत कोळी, डॉ.सौरभ शर्मा, डॉ.धवल रांका, डॉ.ऋषीकेश जाधव, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, ईत्यादींनी परीश्रम घेतले.

 
Top