उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नविन वर्षाच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख असलेल्या या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय एमएच 25 हेल्पिंग हॅण्डस या सामाजिक संस्थेने घेतला आहे. त्यानुसार येत्या रविवारी (दि.2) या मोहिमेचा शुभारंभ रामलिंग पर्यटन स्थळ करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मोजक्या पर्यटन स्थळांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी परिसरातील रामलिंग पर्यटन स्थळाचा परिसर सध्या बेजबाबदार नागरिकांमुळे अस्वच्छ झालेला आहे. कचरा, प्लॅस्टिक, पत्रावळ्या, बिस्किटांचे कव्हर, प्लास्टिक बॉटल्स, दारु बॉटल्स अशा अन्य वस्तुंमुळे जंगल हळु हळु विद्रुप होत चाललेल आहे. त्यामुळे नविन वर्षाच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख असलेल्या या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवुन या पुढेही रामलिंग पर्यटन स्थळ नेहमी स्वच्छ आणी सुंदर राहण्यासाठी एमएच 25 हेल्पिंग हॅण्डस प्रयत्नशिल राहनार आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमींनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top