तुळजापूर  / प्रतिनिधी-

देशी बनावटीच्या गावठी पिस्तूलसह दोघांना शहरातून ताब्यात घेतले. ओंकार कांबळे (रा. काक्रंबा) आणि राजेंद्र कांबळे (रा. खंडाळा), अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान पिस्तूल विक्रीसाठी आणण्यात आले होते का, याची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलसह दोघांना शहरातून गुरुवारी(दि.३०) दुपारी शहरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शहरात पिस्तूल प्रकरणात बुधवारी (दि.२९) रात्री उशिरा उचला-उचली सुरू होती. मात्र याप्रकरणी कमालीची गुप्तता बाळगण्यात येत होती.दरम्यान पिस्तुल बाळगण्याविषयीचा हेतू तपासण्यात येत असून, या प्रकरणात चौकशीसाठी शहरातील अनेकांना ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे.


 
Top