उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासूनजवळील आळणी-ढोकी राज्यमार्गावर ट्रक व कारचा शुक्रवारी (ता.३१) सकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. उस्मानाबाद-लातूर   मार्गावरील भडाचीवाडी (ता.उस्मानाबाद)  येथे लातूरकडे निघालेली कार (एमएच 24 एए 8055) व ट्रॅक्टर घेऊन उस्मानाबादकडे निघालेला ट्रक (एमएच 04 एफबी 2055) यांची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघतामधील कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली. अपघात स्थळावरील दृश्य अंत्यत विदारक होते.

 उस्मानाबाद येथील विश्वनाथ मुंडे यांची कन्या सौ सविता होती. माहेरवून  लातूरकडे परत जात असताना  हा भीषण अपघात झाला. या अपघातात   कारमधील  उमेश मुरलीधर पाडे, सविता उमेश पाडे (पत्नी), मुलगा प्रतिक उमेश पाडे, आई हिरकणाबाई मुरलीधर पाडे (लातूर रा.प्रकाश नगर ) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक एस.एन.साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे व येडशी औट पोस्टमधील हेडकाॅन्टेबल अविनाश शिंदे, सी.व्ही. मुळखेडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. हा अपघात एवढा मोठा होता की ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रक समोरून कारवर गेला. सदर घटनेची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  सदर अपघाताचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. 


 
Top