तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या महिलांनसाठी भाविकांच्या देणगीतुन उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन  डाँ. चेतना सोनकांबळे व   दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या एनजीओ  प्रमुख हेमलता यांच्या हस्ते  बुधवार दि.२२रोजी करण्यात आले.  श्री तुळजाभवानी मंदीराचा मुख्य प्रशासकीय कार्यालयच्या तळमजल्यात अँक्सेस पास काढण्याचा ठिकाणी हे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे.

कर्नाटकातील भाविक श्री शामराव भीमराव यांनी फर्निचर सह हिरकणी कक्ष तयार करण्यासाठी पैसे दिले होते हे काम पुर्ण होताच याचे  दोन कर्तृत्ववान महिला अधिकारींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी  तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे, सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे,  प्राध्यापक संभाजी भोसले पुजारी विकास खपले उपस्थितीत होते. 
Top