तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत सदस्य इर्शाद  मुलानी यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला अप्पर विभागीय आयुक्त  औरंगाबाद यांनी स्थगिती दिली आहे.                                                            

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील इर्शाद मुलानी हे वार्ड क्रमांक सहा मधून 2017 मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते.त्यांनी  अतिक्रमण केल्याची तक्रार तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर व नामदेव  कांबळे यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली होती.जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी वेळोवेळी सुनावणी घेत समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे ग्रा.पं.सदस्य  इर्शाद मुलानी यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 अन्वये इर्शाद मुलानी यांना सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2021 रोजी दिला होता.या निर्णयास इर्शाद मुलानी यांनी अॅड. राजरत्न राऊत यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते . 15 डिसेंबर 2021 रोजी अप्पर विभागीय आयुक्त , औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशास पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली . त्यामुळे इर्शाद मुलानी यांना दिलासा मिळाला आहे.


 
Top