आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ,नगरपरिषद निवडणुका,आंदोलने शाखा स्थापन या अनुषंगाने युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्राम गृह शिंगोली (सर्किट हाऊस), उस्मानाबाद येथे संपन्न झाली.भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठकमध्ये राणादादांना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी मागील काही महिन्याच्या कार्याचा अहवाल दिला.यामध्ये जिल्ह्यात राबवले गेलेले उपक्रम,आंदोलने इत्यादी बाबत सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या काळात युवा मोर्चा आणखी आक्रमकपणे सहभागी राहील व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी केली. बैठीकी मध्ये राणादादा बोलताना उपस्थितीत युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व ते सर्व युवकांसाठी मोलाचे ठरले.युवकांनी दादांना विविध विषयांवर प्रश्न व उपक्रम राबविण्यात बाबत सल्ला घेतला यात प्रामुख्याने तेरणा जनसेवा मार्फत आरोग्य शिबीर राबिविणे, नवीन मतदार नोंदणी,मतदार यादीतील नवे कमी करणे बाबत, केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सामान्य नागरिकांना ,कार्यकर्त्यांना ,ज्यांना व्यवसाय करावयाचा आहे अशा सर्वांना लाभ घेणेबाबत मार्गदर्शन ,सोशल मीडिया वरती आक्रमक होणे इत्यादी विषयी दादांनी युवकांचे मत जाणून घेऊन त्याचक्षणी योजना आखली.सोबतच भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांनी सोशल मीडिया या मुद्यांवर मार्गदर्शन केले आणि विविध अन्यायकारक महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर ,घडामोडीवर भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्त्यांनी ठणकावून आवाज उठवला पाहिजे हे बैठकी दरम्यान सांगितले.

यावेळी उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील,सुनील काकडे ,पंचायत समिती उपसभापती प्रदीप शिंदे ,उपनगराध्यक्ष अभय आबा इंगळे,शहर अध्यक्ष राहुल काकडे ,प्र का स मकरंद पाटील ,यांसह धाराशिव शहर व ग्रामीण भागातील युवा मोर्चाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top