उस्मानाबाद / प्रतिनिधी-

िजल्हयातील आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबाद जिल्हयातील भूम कनेक्शन समोर आले आहे. भूम ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक अधिक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

डॉ. संदीप जोगदंड यांची दोन महिन्यापूर्वी अंबेजोगाई येथे बदली झाली आहे. तर या प्रकरणी काल एकूण पाच जणांना अटक झाली आहे तर यापूर्वी सहा जणांना अटक झाली आहे. 

आरोग्य विभाग गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली होती. हे पेपरफुटीचे प्रकरण आरोग्य विभागाची नाचक्की करणारे ठरले होते.

सानप याने सहा लाख रुपये देऊन पेपर मिळविल्याची माहिती आहे. संदीप जोगदंड हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे वैद्यकीय अधीक्षक होता, त्यांची 2 महिन्यांपूर्वी बदली झाली होती.

 
Top