उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

 कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेच्या  निषेधाचे निवेदन वर्ल्ड मराठा  ऑर्गनायझेशन(डब्ल्यूएमओ)च्या वतीने  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्रींना निवेदन पाठविण्यात आले आहे. 

निषेध निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काही समाज कंटकांनी काळं फासुन समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि असे प्रकार वारंवार येथे होत आहेत तरी याची दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर खटले दाखल करून त्याचा निकाल लावावा. तसे नाही झाले तर सर्व शिवप्रेमी महाराष्ट्रात वेगळ्या मार्गाने विरोध दर्शवितील. बेंगलोर मध्ये याआधी पण अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा निषेध म्हणून आंदोलन करणाऱ्या बांधवावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना योग्य तो न्याय द्यावा, या सर्व गोष्टींचा आम्ही वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संघटनेकडुन जाहीर निषेध करण्यात आले. निवेदनावर  प्रविण गरड, नितीन भांगे, आनंद हाजगुडे, मारुती शिंदे, दयानंद माळी, शंकर बिडवे, मनोज मोरे, धिरज मोरे, ओकंार कोळके, प्रतिक फुटाने, विकास सागर, अनिल गुरव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top