उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रुग्णांना वेळेवर व व्यवस्थित उपचार करून ठणठणीत करणाऱ्या डॉक्टररुपी आरोग्य दूतांचा रुग्णांच्यावतीने सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

रुग्णांची अहोरात्र, नित्यनेमाने व मनोभावे सेवा करणाऱ्या सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विभाग प्रमुख डॉ. गंजाले, प्रा. डॉ. सुदीप एस. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश सोनकवडे, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. अभिजीत साळुंके, वरिष्ठ इन्चार्ज वर्षा शिंदे, अनिल वाघमोडे, परिचारिका मंदाकिनी तांबे, दिपाली कावळे, सुषमा गायकवाड, शुभांगी गरड, परिचारक प्रेम कुमार, गौरव लोखंडे, संतोष गुजरे, वीरुदेव खताळ, अमित बागल यांच्यासह आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, सिक्युरिटी सिस्टम गार्डस् यांचा उस्मानाबाद येथील रुग्ण शाफिया जब्बार शेख व परिवाराच्यावतीने रुग्णालयात सत्कार करण्यात आला.

 
Top