उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील दीप्ती जाधव शेंदारकर निर्मित “जिद्दारी” या मराठी चित्रपटाचा पोस्टर, ट्रेलर व म्युझीक  लॉन्च सोहळा आ. कैलास पाटील यांच्या हस्ते दि.११ डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथील हॉटेल पडवळ फूड झोन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विक्रम गायकवाड, अमित शिंदे व चित्रपटातील सर्व कलावंत उपस्थित होते.

 ए.आर. माइन्ड्स प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जिद्दारी’ चित्रपटाची निर्मिती उस्मानाबाद येथील दीप्ती जाधव शेंदारकर यांची असून चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमोल शिंदे होळकर हे आहेत. सुहास मुंडे, निखिल राजवर्धन

यांनी गीत लेखन केले असून त्या गीतांना  देव-सुचिर यांनी संगीतबद्ध केले आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, सोनिया उपाध्याय, अतुल जोशी या गायक गायिका सोबतच उस्मानाबादच्या राजलक्ष्मी शेंदारकर या

 बाल गायिकेनेही या चित्रपटात गीत गायिले आहे.   मराठवाड्यात निर्मिती झालेल्या या चित्रपटात शेती प्रश्नावरती भाष्य करण्यात आले आहे.

 शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेती पिकली, शेतकरी जगला तरच जगरहाटी सुरू राहील हे येथील वास्तव आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पहायला हवे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. एका प्रेमकथेच्या माध्यमातून या चित्रपटात शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात विदुला बाविस्कर, शुभम तारे, विजय अंजान, रविंद्र सॊळुंके, रवींद्र ढगे, सुधीर माले, राजश्री पठारे, जयश्री सोनवणे यांनी भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे संकलन अमोल निंबाळकर ,पूजा पाटील यांनी केले आहे. कलादिग्दर्शकाची जबाबदारी ज्ञानेश्वर शिंदे, सूरज शिंदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अभिजित कांबळे असून पीआरएल सूरज संजय कदम यांचाही या चित्रपटात विशेष सहभाग आहे. 

 
Top