उमरगा / प्रतिनिधी-

मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता इंजि.भारत कापसे यांची निवड करण्यात आली . 

मराठा सेवा संघाच्या जनसंपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते व प्रदेश कार्याध्यक्ष अर्जून तनपुरे , लातुर जिल्हाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी , तुषार पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . इंजि. भारत कापसे हे मागील २०  वर्षापासून मराठा सेवा संघामध्ये कार्यान्वित आहेत . यावेळी माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी त्यांचा सत्कार केला . यावेळी विभागीय सचिव भास्कर वैराळे , जिल्हा सचिव प्रशांत शेळके , उमरगा शहराध्यक्ष अनिल सगर ,  संभाजी ब्रिगेडचे विशाल माने , सचिन आळंगे , दादा बिराजदार , गोविंद सोबाजी , जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रेखाताई पवार , सचिव ज्योतीताई कावळे , शितल भोसले आदी उपस्थित होते .


 
Top