उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादसह महाराष्ट्रातील चार व कर्नाटकातील एका जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या व मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हभप वसंतराव नागदे यांची एकमताने निवड झाली.निवनिर्वाचित संचालक मंडळाची गुरूवारी बैठक झाली. यामध्ये नागदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तसेच उपाध्यक्षपदी लातूरचे वैजीनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर दोघांचाही सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणूक झाली. परिवर्तन पॅनलचा पराभव करत बँकेचे सत्ताधारी संचालक मंडळ पुन्हा एकदा निवडणुकीत विजयी झाले. नागदे-मोदाणी-शिंदे पॅनलने विजय मिळविल्यानंतर आता बँकेचे नवे अध्यक्ष कोण, याबद्दलची उत्सुकता वाढली होती.मावळते अध्यक्ष ब्रीजलाल मोदाणी यांनी निवडणूक न लढविल्याने व त्यांचे पूत्र आशिष मोदाणी यांना प्रथमच बँकेत संचालकपदाची संधी मिळाल्याने आता नवे अध्यक्ष मोदाणीच की अन्य कोण, अशी उत्सुकता असतानाच बँकेच्या वृध्दीसाठी अनेक वर्षे योगदान असलेल्या नागदे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. उपाध्यक्षपदी वैजीनाथ शिंदे यांची निवड झाली. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडी बिनविरोध पार पडल्या.

 
Top