उमरगा / प्रतिनिधी-

आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन व दिव्यांग विभाग यांच्या वतीने दिव्यांगाचा एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि.३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून या मिळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन आयोजित मेळाव्या प्रसंगी कोरोना काळात अविरत सेवा देणार्यांचा सत्कार करण्याचा माणस खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. होणार आहे.

मेळाव्यासाठी उद्घघाटक म्हणून जिल्ह्यचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे हे उमरगा लोहारा तालुक्याचे  आमदार ज्ञानराज चौगुले  हे राणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप (बाबाजी ) पाटील खंडापुरकर (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.भ्.नि.सं.स. ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन)हे असणार आहेत.

प्रमुख उपस्थितीत प.स.सभापती सचिन पाटील,जि.प.चे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे ,बाबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश (दाजी) बिराजदार, युवानेते किरण गायकवाड, जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील, जि.प. सदस्य अभय चालुक्य, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी,काशिनाथ शिंदे,आनंद भालेराव, आदींची उपस्थिती राहणार आसुन दि.३ डिसेंबर  वार शुक्रवार रोजी सकाळी ११वाजता हुतात्मा स्मारक येथून भव्य  ऱ्याली निघणार आहे.

 दुपारी दोन वजता  शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न. होणार आसुन मेळाव्यामध्ये  उमरगा/लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राण्याचे आव्हान आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती( दिव्यांग विभाग) उमरगा यांनी केले आहे.

 
Top