उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जागृत सभासदामुळेच उस्मानाबाद जनता बँक विस्तारत गेली. व्यवहार मोठया प्रमाणात होऊ लागले. बँकेच्या चारित्र्याबद्दल न कळत संशय आला तर क्षणार्धात उध्दवस्त होऊ शकते. बँकेने ३००० गावात आपलेपणा जपला म्हणूनच दश लाख लोकाची उपजिवीका बँकेवर अवलंबून आहे. दर्जेदार, चोख पारदर्शक कारभार चालवला म्हणूनच सभासदांचा बँकेवर विश्वास आहे असे प्रतिपादन उस्मानाबाद जनता बँकेचे नुतन अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे होते. ते सिध्द गणेश मंदीर देवस्थान व प्रेरणा ग्रुप उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने उस्मानाबाद जनता बँकेच्या नुतन पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभात दिनांक १० डिसेंबर, २०२१ रोजी सिध्द गणेश मंदीर भानुनगरच्या प्रांगणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, विश्वास आप्पा शिंदे, आशिष मोदाणी, नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागदे पुढे म्हणाले की, सभासदांची जागृतता हेच आचे वैभव आहे. आमच्या वागणुकीवर सभासदांचा आंकूश आहे. सभासदांनीच निवडणुक लढविली. सभासदांचा सन्मान करून त्यांना सेवा दिली जाईल. बँकेचे आर्थिक आरोगय चांगले असणे गरजेचे आहे.

यावेळी नुतन संचालक विश्वास आप्पा शिंदे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन तावडे यांनी तर सुत्र संचालन दौलत निपाणीकर यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद, पतंजली आदि संघटनांनी निवडी बद्दल सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन तावडे, मुकुंद कथले, बाळू जाधव, रवि बोधले, आकाश तावडे, धोंडीराम राठोड, अभय साळुके, गणेश साळुके, मंदार वाघमारे गोटू पापडे आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी बालाजी तांबे यांनी आभार मानले.

 
Top