परंडा / प्रतिनिधी :-

कठोर परिश्रम केले तरच यश प्राप्त होते असे मत कमांडो अकॅडमी परंडा येथे सुरज भोसले या विद्यार्थ्याच्या आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी फुले शाहू आंबेडकर  विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

  कमांडो करियर अकॅडमी परांडा येथे तालुक्यातील कुक्कडगाव  परंडा येथील रहिवासी असलेला सागर नंदू भोसले या विद्यार्थ्याने पोलीस नाईक या पदासाठी परीक्षा दिली होती.तो या कमांडो करिअर अकॅडमी चा विद्यार्थी असून त्याने यश संपादन केल्यामुळे आणि त्याची सातारा येथील पोलिस ठाण्यामध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्याचा सत्कार कमांडो करिअर ॲकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष मेजर महावीर तनपुरे यांनी आयोजित केला होता.

  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.  डॉ.शहाजी चंदनशिवे हे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सुरज भोसले यांचा सत्कार शाल फेटा बुके देऊन  सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन महावीर तनपुरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.शहाजी चंदनशिवे म्हणाले की कमांडो करिअर अकॅडमी च्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत अकॅडमी चे विद्यार्थी कठोर परिश्रम करत आहेत.त्यांनी जिद्द व चिकाटी उराशी बाळगून आपले ध्येय साध्य करायचे आहे.आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे .स्वतःची आपल्या आई वडिलांची समाजाची व या देशाची असणारी आपल्यावरची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या लोकसंख्या वाढीमध्ये टिकायचे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे दररोज वर्तमान पत्र वाचले पाहिजेत.

 यावेळी कार्यक्रमासाठी कमांडो करिअर अकॅडमी मधील अनेक आजी -माजी  विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top