उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खेळाडुंची किटअभावी गैरसोय होवू नये, यासाठी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी पुढाकार घेत वाघोली (ता. उस्मानाबाद) येथील शिव-पार्वती क्रीडा मंडळाच्या खेळाडुंसाठी मोफत किट उपलब्ध करून दिल्या आहेत. या किटचे शनिवारी (दि.४) मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

वाघोली येथील शिव-पार्वती विद्यालयाच्या मैदानावर दररोज खेळाडु कबड्डीचा सराव करत आहेत. मातीतला खेळ रूजविण्यासाठी शिक्षकांसह खेळाडू परिश्रम घेत आहेत. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्याकडे खेळाडुंसह शिक्षकांनी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याची तातडीने दखल घेत श्री. बाकले यांनी दोन संघातील खेळाडुंना आकर्षक किट उपलब्ध करून दिल्या आहेत. या किटचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर मगर व राहुल खडके यांच्या हस्ते खेळाडुंना वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर उंबरे, शिवपार्वती क्रिडा मंडळाचे मार्गदर्शक राऊत सर, अमोल मते, सुजित मते, मनोज काकडे, बुबा मगर, मनोज काकडे, वैभव उंबरे, दर्शन नेवाले, सुरज सुलाखे, विश्वास पाटील, शंभु देशपांडे, ऋतिक उंबरे, माधव मगर, संदीप मगर, रफिक शेख, समर्थ मगर आदींसह खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top