काटी / प्रतिनिधी
मंगरुळ बीट अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षकांचा गौरव व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आदर्शवत असून कोरोनानंतर शिक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन   जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
 उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात शनिवार दि. 4 रोजी दुपारी जिल्हा परिषद शिक्षण विभागा अंतर्गत मंगरुळ बीट स्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये  सभापती रेणुकाताई इंगोले, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर आदींची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी बोलताना डाॅ.गोविंद नांदेडे यांनी विस्तार अधिकारी मल्हारी मार्गदर्शनाखालीचालू असलेल्या उपक्रमाखाली कौतुक केले. शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम राखावी व वाडी, वस्ती, तांडा,दुर्गम भागातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे,ऑनलाईन शिक्षण आले पण व्हॉट्स अप, फेसबुकच्या विळख्यात मुल गुरफटून गेली. अनेक विद्यार्थी लहान वयातच व्यसनाधीनतेकडे वळल्याचे सांगून व्यसनमुक्त देश, व्यसनमुक्त महाराष्ट्र हि संकल्पना  शिक्षकांनी राबवावी असे आवाहन नादेडे यांनी केले. 
यंदाच्या बीट स्तरीय सावित्री ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार 15 शिक्षकांना मिळाला असून 27 शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.    माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे,    भिवाजी इंगोले,  विस्तार अधिकारी काळे, केंद्र प्रमुख संजय वाले, विठ्ठल गायकवाड,शिक्षक संघटनेचे बिभिषण पाटील, विक्रम पाटील, बशीर तांबोळी, कल्याण बेताळे, राजकुमार म्हेत्रे, शिवाजी साखरे,  पंडागळे, घोंगडे, केशव काळे, प्रशांत गायकवाड, नागनाथ वडणे, डि. एम. चव्हाण,  शांताराम गायकवाड,देशभुषन दुरुगकर, पोपट सुरवसे आदीसह तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. 
      .दरम्यान   विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी प्रास्ताविक केले  तर  सूत्रसंचालन  शिवाजी साखरे व रंजना स्वामी यांनी केले तर आभार विठ्ठल गायकवाड  यांनी मानले
 
Top