उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हास्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन चिखली (ता. उस्मानाबाद) येथे करण्यात आले.स्पर्धेचे आयोजन जिल्हा कबड्डी  असोसिएशन व ग्रामपंचायत चिखली यांच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्ह्यातील जवळपास 44 संघानी स्पर्धेमध्ये नोंदणी करुन सहभाग नोंदविला होता. विविध वयोगटातील जिल्ह्याचे मुली, मुलांचे संघ या स्पर्धेतुन निवडले जाणार असल्याने या स्पर्धेचे महत्व अधिक आहे. या शिवाय अनेक खेळाडुना राज्य पातळीवर खेळण्याची संधी यामुळे निर्माण होणार आहे, ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याची अशी स्पर्धा भरविल्याने निश्चितच त्याचा चांगला उपयोग परिसरातील खेळाडुना होणार आहे.   

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम भैय्या जाधव, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहसचिव महादेव साठेर,जिल्हा असोसिएशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मोहिते,माजी सरपंच देवीदास जाधव,सरपंच वृंदावणी जाधवर, उपसरपंच उत्रेश्वर जाधव, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ह्रदयेश्वर सुरवसे,शाहु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जलराज चोबे, विकास जाधव,युवासेना सचिव गूरुनाथ गवळी,युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे,क्रिडा प्रशिक्षक पवन वाटवडे,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तेजस सुरवसे,शिवसेनेचे चिखली गणप्रमुख समाधान जाधव,सोसायटीचे सदस्य सुरेश जाधवर,बापु जावळे, असोसिएशनचे सदस्य नितीन हुंबे, प्रशिक्षक सम्राट माने, पोपट पुरी यांच्यासह ग्रामस्थ, खेळाडु आदीची उपस्थिती होती.यावेळी आधुनिक साधनाचे उद्घाटनही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटनानंतर वाशी विरुध्द कळंब या संघामध्ये सामना खेळविण्यात आला.क्रिडाप्रशिक्षक शाम जाधवर व गावातील राष्ट्रीय खेळाडुनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे.

 
Top