उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौक येथे ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात काळ्या फिती लावून ओबीसी समाज बांधवांनी  निषेध आंदोलन केले.ओबीसींचे राजकीय आरंक्षण अबाधित राहावे यासाठी केंद्र आणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुरावे देण्यास कमी पडल्याची ओबीसी समाजाची भावना आहे.त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हक्काचे आरक्षण टीकु शकले नाही.याचा आज निषेध करण्यात आला.आज राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.उद्या नौकरी व शैक्षणिक आरक्षणही हिरावले जाईल अशी भीती समाज बांधवामध्ये आहे.म्हणजेच आरक्षण विरहित भारत देश होईल व यामुळे राज्यातील व देशातील भूमिपुत्र ओबीसी बांधव सर्वच क्षेत्रात नामशेष होईल अशा ओबीसी बांधवांच्या भावना आहेत.

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्यावर   सुप्रिम कोर्टात शिक्कामोर्तब झाल्याने  उस्मानाबादेत  ओबीसी समाजाने काळ्या फिती लाऊन शासनाचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात ओ बी सी मोर्चाचे नेते पी टी मुंडे,बारा बलुतेदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ओबीसी संघर्ष समीतीचे अध्यक्ष लक्ष्मण माने,पत्रकार तथा बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हंबीरे,माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,अँड खंडेराव चौरे,भारत डोलारे,इंद्रजित देवकते,सचिन शेंडगे,जारी समाजाचे नेते पांडुरंग लाटे,नितिन शेरखाने,शिवानंद कथले,सतिश कदम,महादेव माळी,सुरेश गवळी,बंटी बेगमपुरे,महादेव मेंगले,लक्ष्मण निर्मळे,जितेंद्र घोडके,देवकते,आदिसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top