उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चांदसाहेब शेख तर उपाध्यक्षपदी भीमसेन हजारे यांची निवड  तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुरुवार दि. १६  रोजी झालेल्या  पालक  मेळावात  करण्यात आली.

  इयत्ता पहिली ते चौथी शाळेत  पालक मेळाव्यासाठी गावातील महिला व पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे या निवडी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. यामध्ये ८ जणांच्या समितीत ५०%महिलांना संधी देण्यात आली तसेच एससी ,  एसटी , ओबीसी व अल्पसंख्याक समाजाला यामध्ये समाविष्ट करण्यात आले. यामध्ये  शैला प्रसाद खोपडे , उषा बाळू पारधे , माधुरी सुभाष पाचपुंडे , चैताली किशोर हजारे  यांची महिला प्रतिनिधी म्हणून तर चांदसाहेब मकबूल शेख , अमोल लक्ष्मण लबडे , सल्लाउद्दीन गुलाब तांबोळी , भीमसेन मोहन हजारे  यांची पुरुष प्रतिनिधी व संभाजी दत्तात्रय सरडे यांची शिक्षण प्रेमी  म्हणून निवड करण्यात आली. यासाठी  प्राथमिक शाळेचे  मुख्याध्यापक डोलारे सर , कुलकर्णी सर , हेरकर मॅडम , येरटे मॅडम , राठोड मॅडम व  सर्वच शिक्षक यांनी अतिशय सुरेख नियोजन केले होते यावेळी  मंगरूळचे प्रथम नागरिक महेश डोंगरे , उपसरपंच गिरीश सर डोंगरे , केंद्र प्रमुख वाले सर , ग्रामपंचायत सदस्य , आप्पासाहेब जेटीथोर , आदमशा फकीर , विजय गरगडे , विरेश डोंगरे , सुभाष पाचपुंडे , मनोज डोंगरे ,  मनोज धुरगुडे ,किरण पारधे , विलास कोरेकर , दादा नारायनकर , सोमनाथ माळी , रमजान शेख यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते त्यांच्या यानिवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.


 
Top