उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगराध्यक्ष मकरंदराजे निंबालकर यांचा कालावधी ३० िडसेंबर २०२१ रोजी संपला आहे. राजेनिंबाळकर यांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपल्या पदाचा पदभार प्रशासक तथा मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्याकडे सोपविला.यावेळी न.प.तील विभागप्रमुख उपस्थित होते. 


पदभार सोडल्यानंतर मकरंदराजे निंबाळकर यांनी न.प.इमारतीच्या पायरीचे दर्शन घेतले.  यावेळी  मकरंदराजे भावनाविवश झाले होते. मकरंद राजेनिंबाळकर यांना नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून गेल्या  १५ वर्षांपासून या वास्तूचा सहवास लाभला होता.   नगराध्यक्ष म्हणून त्याची कारर्कीद यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. प्रथम जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राजेनिंबाळकर यांंचा काही कालावधी कोर्ट कचेरीमध्ये गेला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी राजेनिंबाळकर यांना निवडून देऊ नका ते जास्त काळ नगराध्यक्षपदी राहू शकत नाहीत, अशा प्रकारचा विरोधी प्रचार केला होता. अशा विरोधी वातावरणात मकरंदराजे निंबाळकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. 

प्रशासक म्हणून हरिकल्याण यलगट्टे यांनी पदभार स्विकारला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी न.प. निवडणुका लांबल्यामुळे प्रशासक म्हणुन माझी नियुक्ती केली आहे. या कालावधीमध्ये नगराध्यक्षांनी करावयाची सर्व कामे माझ्या अधिकारात आले आहेत. शहरातील विकास कामे त्याचप्रमाणे मुलभूत सोई-सुविधा असे मुलभूत कर्तव्य पार पाडणार आहे. शहरातील जनतेने  कोवीडचे लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे नियम स्वच्छतेचे नियम पाळावे, असे आवाहन प्रशासक यलगट्टे यांनी केले आहे. 

 
Top