उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पाटोदा (ता. उस्मानाबाद) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनाप्रणित पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. एकूण 13 जागांपैकी 11 जागावंर विजय मिळवित शिवसेनेने या सोसायटीवर भगवा फडकाविला आहे.

पाटोदा, बरमगाव (बु.), वडाळा कार्यक्षेत्र असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनाप्रणित अष्टभुजा ग्राम विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. 13 जागांपैकी 11 जागांवर शिवसेनाप्रणित अष्टभुजा ग्राम विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. त्यात पॅनेलप्रमुख चंद्रकांत रघुनाथ ताकमोगे, किसन गोपाळ केदार, सुनिल दशरथ आसबे, काकासाहेब बळी भद्रे, बालाजी सौदागर पवार, जगन्नाथ भगवान कदम, अशोक लक्ष्मण पवार, गोविंद भानुदास माळी, धनंजय सूर्यभान गायकवाड, सौ. मिनाक्षी अंगद ढोले, सौ. कालिंदाबाई दत्तु बोंडगे यांचा समावेश आहे.

पाटोदा येथील सोसायटीवर वर्चस्व मिळवून शिवसेनेने सहकार क्षेत्रात शिरकाव केला आहे. शिवसेनेने पाटोदा सोसायटीवर भगवा फडकाविला असून, यासाठी पाटोदा, बरमगाव (बु.), वडाळा येथील मतदार व ग्रामस्थांनी शिवसेनाप्रणित पॅनेलला मोठे सहकार्य केले. 

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार प्रा. तानाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे -पाटील यांनी या पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

 
Top