परंडा/प्रतिनिधी :- 

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे स्वतः दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःचा आणि समाजाचा विकास करावा असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ.दिपा सावळे यांनी महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक दिनानिमित्त अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या उपस्थित होत्या. प्रा.अनिसा शेख यांनी अल्पसंख्यांक म्हणजे काय ,अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारच्या कोणत्या योजना दिले जातात याविषयी सविस्तर माहिती दिली तर  प्रा. सुर्यवंशी यांनी भारतीय संविधान आणि त्यातील अल्पसंख्यांकांचे अधिकार या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

       व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे , प्रा.सूर्यवंशी, प्रा.अनिसा शेख या उपस्थित होत्या .यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.यावेळी प्रा.शेख आणि प्रा सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा शिर्के या विद्यार्थिनीने केले तर आभार कु.दीप्ती पाटील हिने मानले.

 
Top