परंडा / प्रतिनिधी : -

आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजे खासापुरी (चव्हाणवाडी), ता. परंडा येथे हनुमान मंदिर परिसरात खुले सभागृह बांधकाम करणे एकुण किंमत १०.०० /- लक्ष (किंमत लाखात) या कामाचा शुभारंभ आ.ठाकूर यांचे चिरंजीव कु. समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

       यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष मेजर महावीर तनपुरे, ॲड. तानाजी वाघमारे जिल्हा सरचिटणीस ओ. बी. सी. मोर्चा, ता. उपाध्यक्ष साहेबराव पाडूळे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, भाऊसाहेब चव्हाण, विजय जगदाळे, नागनाथ जगदाळे, धनंजय जगदाळे, विजय जगदाळे, मेजर बप्पा जगदाळे, दया किलचे, बिभीषण चव्हाण, शिवसिंग नगरे, रवींद्र देडगे, आंकुश चव्हाण, मेजर बलभीम शिंदे, राजाभाऊ चव्हाण, जीवन राऊत तसेच गावातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top