तुळजापूर / प्रतिनिधी-

 कर्नाटकातील विजयपूर येथील लक्ष्मी विठ्ठल सिद्धांत या भाविकाने तुळजाभवानी चरणी १ लाख रुपयांची देणगी वाहिली तर कोल्हापूर येथील सुधीर शशिकांत चव्हाण या भाविकाने तुळजाभवानी मातेस एक किलो वजनाची चांदीची तलवार वाहिली.

दोन्ही भाविकांचा मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा हस्ते देवीची प्रतिमा, साडी प्रसाद, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी अरविंद भोसले मंदिर कर्मचारी विश्वास कदम, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे आदींची उपस्थिती होती.

 
Top