तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यात होणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यजमानपदी पुजारी मंडळाचे सदस्य प्रवीण नरहरी कदम (केशव ) यांची निवड करण्यात आली . 

श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवाचे  यावर्षीचे  यजमानपद निवडीसाठी  सोमवारी दि.२७ रोजी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यजमान पदासाठी नऊ  पुजाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली. यात यजमान पदासाठी चिठ्ठी द्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात आली  यात  प्रवीण नरहरी कदम (केशव )यांच्या नवाची चिठ्ठी निघाल्याने  शाकंभरी नवरात्रच्या यजमानपदी  पुजारी प्रवीण नरहरी कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. निवाडीनंतर   मंडळाच्या वतीने अध्यक्ष बिपिन शिंदे  यांनी प्रविण कदम यांचा पुष्पहार घालुन सत्कार केला.

 यावेळी  अविनाश गंगणे  नागेश साळुंके , सुधीर रोचकरी , शिवाजी बोदले , प्रा . धनंजय लोंढे , अविनाश गंगणे , गणेश आंदुरकर , किशोर गंगणे , विशाल रोचकरी , कालिदास चिवचिवे आदीसह पुजारीवृंद उपस्थितीत  होते.


 
Top