उमरगा  / प्रतिनिधी

 तालुक्यातील कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट कपिल वस्तू परिसरात शुक्रवारी (दि ३१) बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भीमगीत गायिका कडुबाई खरात यांचे गायन होईल.

कराळी कपिल वस्तू येथील धम्म परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते होणार असून सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री संजय बनसोडे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी बौद्ध भिक्षु उपगुप्त महाथेरो, डॉ सुमेधबोधी महाथेरो, भन्ते सुमेध नागसेन, सुमंगल, भन्ते डी धम्मसार आदींची धम्म देसना होणार आहे. धम्मपरिषदेस तालुक्यातील धम्मप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष विलास खिल्लारे, उपाध्यक्ष मत्सेंद्र सरपे, सचिव संजीव ओव्हळ, संचालक डॉ रत्नदीप गायकवाड आदींनी केले आहे.

 
Top