उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या केशवराव पाटील इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी व जिल्हा रूग्णालय मधील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतीबंध कक्ष याच्या संयुक्त विद्यामाने ०१ डिसेबर जागतीक एड्स दिनानिमित्त  मास्क डिझाईनींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये डि फार्मसी प्रथम वर्षातील ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यानी एड्स, कॅन्सर, क्षयरोग, हदयरोग व कोवीड - १९ याविषयावर जनजागृती होईल असे विषय निवडुन उत्कृष्ट डिझाईन व संदेश मास्कवर देण्याचा प्रयत्न केला . स्पर्धेनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास सुरवसे यांनी सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले . 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top